कालमापनाचे साधन ः ‘पंचांग’

0
278
  • सुमरंग राय
    सालसेत आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग किती शास्त्रोक्त आहे ते. ग्रहणाच्या वेळेवरूनच आपल्याला कळून येईल की आपलं पंचांग हे वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे. क्षणाक्षणाच्या बदलाची माहिती पंचांग देत असते.

सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा!
पंचांग हे नावच सांगतं की पाच अंग असलेला विषय. यात तिथी, वार, नक्षत्र, योग, करण यांचा समावेश केला जातो. हे पाच विषय उपयोगात घेऊन कालाचे मापन करायचे साधन म्हणजे ‘पंचांग’. तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचे झाले तर पंचांग म्हणजे ‘हिंदू दिनदर्शिका’. भारतात पाश्चिमात्यांचे ग्रेगोरीयन कॅलेंडर यायच्या अगोदर आम्ही पंचांग वापरत होतो. आमच्या पंचांगात दोन प्रकार आहेत. एक सौरमान पंचांग- सूर्याच्या चलनावर आधारित पंचांग. दुसरे – चंद्राच्या चलनावर आधारित पंचांग. दक्षिण भारतातील लोक जास्तीत जास्त चांद्रमान पंचांग वापरतात. मकरसंक्रांत आणि धनुर्मास पुजा हे सौरमान पंचांगाप्रमाणे साजरे केले जातात.
ग्रहणाची वेळच सांगते की आमचं पंचांग किती शास्त्रोक्त आहे ते. ग्रहणाच्या वेळेवरूनच आपल्याला कळून येईल की आपलं पंचांग हे वैज्ञानिकदृष्ट्या अचूक आहे. क्षणाक्षणाच्या बदलाची माहिती पंचांग देत असते. हे बदल पंचांगात दिलेल्या सूत्रांच्या आधारे, गणित करून सांगतात.

हिंदू धर्मात पाडव्याच्या दिवशी पंचांगस्थ गणपतीची पूजा करून गुढी उभारून ह्या वर्षाचे भविष्य फळ वाचण्याची पद्धत आहे. फळाच्या आधी ज्योतिष्यांनी सृष्टिकर्त्या ब्रह्माला किती वय झालं, आमच्या पृथ्वीला किती वय झालं, तसंच किती शककर्ता होऊन गेले या विषयीचे विवेचन करतात. चार युगे, एक हजार वेळा येऊन गेले की ब्रम्हदेवांचा एक दिवस. ब्रम्हदेवांचे एका दिवसात चौदा मनू होऊन जातात. एका मनूचा अधिकार अवधी (७१) महायुगे आहेत. एका महा युगाचा अवधी ४३,२३,००० वर्ष आहे. आता आपण सध्या सातव्या मनू वैवस्वत मन्वंतरात (अधिकार) जगत आहोत. आत्ता ह्या मन्वंतराची सत्तावीस युगे संपली. आता अठ्ठाविसावं चालू आहे. एका महायुगामध्ये चार युगं येतात. जसे कृतयुग (१७,२८,०००) वर्षे, त्रेतायुग (१२,१९,०००) वर्षे, व्दापारयुग (८,६४,०००) वर्षे कलियुग (४,३२,०००) वर्षे. कलियुगात सहा शककर्ता आहेत. युधिष्ठिर, विक्रमादित्य, शालिवाहन, विजयाभिनंदन, धारातीर्थी नागार्जुन, कल्की. यांपैकी शालिवाहन शक वापरण्यात आहे.
असं सुंदर वैज्ञानिक कॅलेंडर नष्ट होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी किमान घरात तरी पंचांग वापरायला शिकायला हवे. म्हणून पंच अंगांचा परिचय करून घेऊया.

तिथी – तनोति विस्तारयती चंद्रकलामिति तिथी:| – म्हटलं तर चंद्राच्या कलेची वृद्धी आणि क्षय होतो तीच तिथी. पाडव्यापासून पौर्णिमा किंवा अमावस्येपर्यंत एकूण १५ तिथी आहेत.
वार – सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार.
हे ग्रह सत्तावीस नक्षत्र आणि बारा राशींवर अतिक्रमण करत करत प्रभाव टाकतात. त्यामुळे पंचांगकर्तृ हे होरे म्हणून कल्पना करून वापरतात.
नक्षत्र न क्षरतीति नक्षत्रम्, म्हटलं तर चलन नसलेले नक्षत्र. ज्या महिन्यात चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रावर असतो त्याचं नक्षत्रावरून त्या महिन्याला नावं पडलं. उदाहरणार्थ चैत्र मासात चंद्र चित्रा नक्षत्रावर असतो.

योग- सूर्य चंद्राची मीलनाची वेळ म्हणजेच योग.
करण तिथ्यर्धं परिमितं करणम् – तिथीच्या अर्ध्या काळाला करण म्हणतात. म्हणून दिवसाला दोन करण.
वर्षात दोन अयन येतात. उत्तरायण आणि दक्षिणायन. सूर्याचा पथ दक्षिणेत जातो ते दक्षिणायन आणि उत्तरपथ जातो तेव्हा उत्तरायण. ६० संवत्सर आहे. प्रती वर्षाला वेगळ्या वेगळ्या संवत्सराने संबोधतात. तेच साठ वर्ष नंतर पुनरावृत्त होतं. आता आम्ही शार्वरी संवत्सर पासून प्लवनाम संवत्सरात् पाय ठेवत आहोत. एका वर्षात दोन महिन्याला एक ऋतू प्रमाणे सहा ऋतू येतात. महिन्याला दोन पक्ष असतात. एक शुक्लपक्ष प्रतिपदेपासून पोर्णिमेपर्यंत आणि दुसरा कृष्णपक्ष प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत.

पंचांग बघायचा क्रम बघुया. गुढीपाडव्याच्या दिवसाचे पंचांग
कलियुगाब्ध ५१२३ श्रीमन्नृपशालिवाहन शक: १९४३ प्लवनाम संवत्सराचं उत्तरायण, वसंतऋतू, चैत्रमास, शुक्लपक्ष, प्रतिपदा, मंगळवार (५१२३ वर्ष म्हटलं तर कलियुग सुरू होऊन एवढी वर्ष झाली. १९४३ म्हटलं तर शालिवाहन शक सुरू होऊन एवढी वर्ष झाली.)
आम्ही वर्ष, महिना, वार, दिवस जसं लक्षात ठेवतो, तसं पंचांग लक्षात ठेवायला त्रास नाही. जसं १ जानेवारीला आम्ही संकल्प करतो, तसं ह्या पाडव्यापासून आम्ही पंचांग वापरायचा संकल्प करुया. तुमचं म्हणणं काय?