कारवर झाड पडल्याने सांगेत महिलेचा मृत्यू

0
12

चारचाकी चालवण्याचे प्रशिक्षण घेताना अचानक कारवर झाड पडल्यामुळे सांगे येथे विवाहित महिलेचा जागीच मृत्यू होण्याची घटना काल गुरूवारी सकाळी घडली आहे. या घटनेत अनिता कुलासो या महिलेचा मृत्यू झाला. काल सकाळी दहाच्या दरम्यान हा प्रकार घडला.

अनिता यांनी नुकतेच कार चालवण्याचे प्रशिक्षण घेण्यास सुरूवात केली होती. त्या चालवत असलेली कार सांगे पोलीस स्थानकाजवळ पोहोचली असता अचानक गाडीवर मोठे झाड कोसळले. त्यामुळे गाडीचा चक्काचूर झाला. या घटनेच अनिता ह्या गाडीतच चिरडल्या गेल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात अनिता यांच्या प्रशिक्षकांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.