काय आहे… कोरोनरी हार्ट डिसीज?

0
265
  • डॉ. बिपीनचंद्र भामरे
    (कार्डियो थोरॅसिक सर्जन)

हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या इतर कुठल्याही स्नायूंपेक्षा जास्त जोरकसपणे, सातत्याने आणि नियमितपणे करावे लागते. हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते.

कोरोनरी हार्ट डिसीज हा एक आजार आहे ज्यात हृदयाला ऑक्सिजन आणि रक्त पुरविणार्‍या रक्तवाहिन्या संकुचित होतात. कारण ज्या रक्तवाहिन्या हृदय आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तपुरवठा करतात त्यांच्या कडांवर प्लेक (फॅ टी पदार्थ) जमा होतात. यामुळे हृदयाला रक्तपुरवठा होण्यास अडथळा निर्माण होतो. या स्थितीला कोरोनरी आर्टरी डिसीज म्हणून ओळखलं जातं. हा हृदयरोगाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. छातीत दुखणं, धाप लागणं, मळमळ होणे, अचानक चक्कर येणं आणि घाम येणं ही या आजारात लक्षणं दिसून येतात. मधुमेहामुळे अशा प्रकारच्या आजारात चौपटीने वाढ होऊ शकते.

हृदयाच्या स्नायूंना रक्तपुरवठा करणा-या स्वत:च्या रक्तवाहिन्या (रोहिण्या) असतात. हृदयाच्या स्नायूचे दर मिनिटाला सुमारे ७० वेळा आकुंचन-प्रसरण होत असते. हे काम शरीरातल्या इतर कुठल्याही स्नायूंपेक्षा जास्त जोरकसपणे, सातत्याने आणि नियमितपणे करावे लागते. हृदयाच्या स्नायूंना रक्तप्रवाहामार्फत प्राणवायू पुरवण्याचे काम काही क्षण जरी बंद पडले तरी हृदय बंद पडू शकते. त्यामुळे हृदयक्रिया दोन-तीन मिनिटे जरी बंद झाली तरी मेंदूचे कामकाज थांबून मृत्यू ओढवू शकतो.

हृदयाला दोन वाहिन्या रक्तपुरवठा करतात. डावी मुख्य आणि उजवी हृदय रोहिणी. त्यापैकी डाव्या रोहिणीचे दोन भाग होतात.

  • वाढते वय, मधुमेहासारख्या आजारामुळे हृदयातील या रोहिण्यांमध्ये कोलेस्ट्रॉल साचते. सीएबीजीमध्ये शस्त्रक्रिया करून रक्तपुरवठा करण्याचा पर्यायी मार्ग तयार केला जातो.
  • हृदयाच्या रक्तवाहिन्यांना अडथळ्याच्या पुढे पर्यायी रक्तवाहिन्या जोडून पुरेसे रक्त पुढील भागाला पुरवण्याची व्यवस्था करणे यालाच बायपास सर्जरी असे म्हणतात. बायपास सर्जरीमध्ये अडथळ्यांना बायपास करण्यासाठी ज्या रक्तवाहिन्यांचा वापर केला जातो त्यांना ‘ग्राफ्ट’ असे म्हणतात. पायाच्या अशुद्ध रक्त वाहणार्‍या रक्तवाहिन्या, हाताची शुद्ध रक्त वाहणारी रक्तवाहिनी आणि छातीच्या पिंजर्‍यामधील रक्तवाहिन्या या ग्राफ्ट म्हणून वापरल्या जातात.
    भारतीय रुग्णांमध्ये कोरोनरी आर्टरीचा आकार हा पाश्चिमात्य नागरिकांच्या तुलनेने लहान असतो. आमच्या रुग्णांना बर्‍याचदा मधुमेह असतो त्यामुळे बायपास हा अनेक महत्त्वपूर्ण कोरोनरी आर्टरी ब्लॉक्सवर उपचार करण्याचा उत्तम मार्ग ठरतो. बायपास सर्जरी म्हणजे हा अगदी शेवटचा पर्याय नसून पुढील २० ते २५ वर्षे रुग्ण उत्तम जीवन जगू शकतो. शस्त्रक्रियेनंतर आपण चांगले आयुष्य जगण्यासाठी जीवनशैलीत योग्य बदल करून निरोगी आयुष्याच्या दृष्टीने चांगल्या शारीरिक सवयींचे पालन करणे गरजेचे आहे. सुरुवातीचे ४ ते ६ आठवडे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे.