कायदा – सुव्यस्था बिघडली; विशेष अधिवेशन घ्या ः युरी

0
2

राज्यातील कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे बिघडलेली असून या पार्श्वभूमीवर गोवा सरकारने कायदा व सुव्यवस्था या विषयावर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली. काँग्रेस भवनात काल शुक्रवारी पत्रपरिषदेत बोलत होते.
युरी आलेमाव यांनी, राज्यातील पोलिसांना कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याबाबतीत पूर्णपणे अपयश आले आहे. गोव्यात गुन्हेगारीत वाढ होत चाललेली असून गोवा राज्य हे गुन्हेगारांसाठी आश्रयस्थान बनले असल्याचा आरोप केला. परराज्यातून मोठमोठे गुंड व चोरटे गोव्यात येऊन खून, चोऱ्या, मारामारी करू लागले असून राज्यात गुन्हे होऊ नयेत यासाठी पोलिसांकडून कोणतेही प्रयत्न केले जात नसल्याचा आरोपही आलेमाव यांनी यावेळी केला.