कला व संस्कृती खात्यातर्फे कोविडवर चित्रपट

0
94

कला आणि संस्कृती संचालनालय गोव्यातील कलाकारांना चित्रपट निर्मितीमध्ये व्यासपीठ मिळवून देईल, असे प्रतिपादन कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी काल केले. कोविडवर आधारित ‘चला पुन्हा उठू’ या पहिल्या चित्रपटाच्या प्रकाशन सोहळ्यात मंत्री गावडे बोलत होते. कला व संस्कृती संचालनालयाकडून यापुढे चित्रपटांची निर्मिती केली जाणार असून स्थानिक कलाकार व तंत्रज्ञांना संधी दिली जाईल. पहिला चित्रपट कमीत कमी खर्चात तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. असे मंत्री गावडे यांनी सांगितले. या चित्रपट निर्मितीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचा उद्देश नाही. हा चित्रपट यू ट्यूब, वेबसाइटवर उपलब्ध केला जाणार आहे. ५१ व्या इफ्फीमध्ये या चित्रपटाचे प्रदर्शन करण्यासाठी प्रयत्न होईल असे ते म्हणाले.