कर्नाटक सरकार गोव्यात कन्नड भवन उभारणार

0
34

>> १० कोटी रुपयांचा निधी मंजूर

गोव्यात राहणार्‍या कर्नाटकातील कन्नडिगांसाठी गोव्यात कन्नड भवन उभारण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला असून त्यासाठी कर्नाटक सरकारने १० कोटी रू.चा निधी मंजूर केला आहे. अखिल गोवा कन्नडा कॉंग्रेसने कर्नाटकचे मुख्यमंत्री एस. बोम्मई यांची नुकतीच भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस व गोवा प्रभारी सी. टी. रवी हेही उपस्थित होते.

कर्नाटक सरकार गोव्यात १० कोटी रु. खर्चून कन्नड भवन उभारण्यास सर्व ते सहकार्य कन्नडिगांना करील, असे यावेळी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी कन्नडिगांच्या शिष्टमंडळाला सांगितले.

उत्तर कर्नाटकातील लोक मोठ्या संख्येने गोव्यात स्थायिक झालेले आहेत. भाषा संवर्धन आणि कन्नड लोकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी गोव्यात कन्नड भवन बांधण्यास कर्नाटक सरकार वचनबद्ध आहे असे यावेळी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या शिष्टमंडळाला सांगितले.