कर्नाटकातील खाण घोटाळ्यात गोव्याचा एक मंत्री ः चोडणकर

0
2

कर्नाटक राज्यातील खाण घोटाळ्यात गोव्यातील एक मंत्री गुंतलेला आहे असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे. सदर मंत्र्याविरोधात खटला 2015 सालापासून सुरू आहे. त्या खटल्याचा निकाल येत्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर केला जाणार आहे, असे सोशल मीडियावर जारी केलेल्या एका संदेशात श्री. चोडणकर यांनी म्हटले आहे. या खाण घोटाळ्यातील खटल्यात सदर मंत्री दोषी घोषित केल्यास त्याला सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. कर्नाटक लोकायुक्तांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने खाण घोटाळ्याचा तपास करून त्या मंत्र्याविरोधात खास न्यायालयात आरोपपत्र दाखल केलेले आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे.