कन्हैय्याकुमार व मेवानी यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

0
35

सीपीआय नेते कन्हैय्याकुमार आणि गुजरातचे अपक्ष आमदार जिग्नेश मेवानी यांनी काल कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. तत्पूर्वी, राहुल गांधी यांच्यासह दोन्ही नेत्यांनी दिल्लीतील भगतसिंग यांच्या पुतळ्याला पुष्पहार घातला. यावेळी गुजरात कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेलदेखील उपस्थित होते. यावेळी कन्हैय्याकुमार यांनी, आम्ही देशातील सर्वांत जुन्या लोकशाही पक्षात प्रवेश केला आहे. कारण कॉंग्रेस वाचली नाही तर देश टिकणार नाही, असे सांगितले. लोकसभेतील जवळपास २०० जागा अशा आहेत, जिथे भाजपसमोर कॉंग्रेसशिवाय कुठलाही पर्याय नसल्याचे ते म्हणाले.