कदंब वाचविण्यासाठी निकृष्ट बसगाड्यांची खरेदी बंद करा

0
103

कर्मचार्‍यांच्या महामेळाव्यात मागणी
आपल्या दीर्घकालीन मागण्या धसास लावण्यासाठी काल कदंब महामंडळाचे चालक व अन्य कर्मचार्‍यांच्या झालेल्या महामेळाव्यात कदंब वाचविण्यासाठी निकृष्ट दर्जाच्या बसगाड्या खरेदी करणे बंद करण्याची जोरदार मागणी कर्मचार्‍यांनी केले.
सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारसीनुसार महामंडळाने कर्मचार्‍यांना अद्याप थकबाकी दिलेली नाही. रोजंदारीवर काम करणार्‍यांना सेवेत नियमित करण्याच्या दृष्टीने अद्याप कोणतीही पावले उचललेली नाहीत, असे सांगून कदंबला सावरण्यासाठी सरकारने येत्या अर्थ संकल्पात ६० कोटींचे अनुदान देण्याची तरतूद करावी, अशी मागणीही कामगारांनी केली. कदंब फायद्यात आणण्यासाठी नव्या मार्गांचे राष्ट्रीयकरण करण्याचीही मागणी केली आहे. या महामेळाव्यात कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका, ज्योकीम फर्नांडिस, ऍड. राजू मंगेशकर आदींनी मार्गदर्शन केले.