कचरा व्यवस्थापन गंभीर समस्या : मुख्यमंत्री

0
113

गोवा हे स्वच्छ आणि नितळ राज्य करण्याच्या उद्देशाने सरकारने स्वच्छ भारत, नितळ गोंय ही मोहिम चालीस लावून त्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यावर भर दिला आहे. मात्र कचर्‍याच्या समस्येमुळे सर्व क्षेत्राच्या विकासावर वाईट परिणाम झाला असून त्यामुळे कचरा व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या ठरली आहे. गोव्याला २०२० पर्यंत कचरामुक्त राज्य बनविण्यासाठी सरकारचे प्रयत्न असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी येथील जुन्या सचिवालयासमोर आयोजित स्वातंत्र्यदिन सोहळ्यावेळी बोलताना केले.गोव्यात रोजागारीचा प्रश्‍न आहे. अशा विषयावर मात करण्यासाठी मजूरांना प्रतिष्ठेची भावना असली पाहिजे. राज्यातील अंमली पदार्थासंदर्भात बोलताना पर्रीकर यांनी राज्यातील पोलीस दलाला अशा अमली पदार्थाचा व्यवसाय करण्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत असे सांगितले.
आजच्या युवकांना योग्य शिक्षण व मार्गदर्शन करणे आवश्यक आहे त्यामुळे ते वाईट सवयीकडे वळणार नाहीत असेही ते म्हणाले. प्राथमिक पातळीवरूनच शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी लोकांनी सहकार्य द्यावे असे आवाहन त्यांनी केले.सदर कार्यक्रमास मंत्रीगण तसेच विरोध पक्षनेते चंद्रकांत कवळेकर, आमदार आदी उपस्थित होते.