औषधालयाला आग लागून साखळीत १ कोटीचे नुकसान

0
278

साखळी येथील दौलतारा मेडिकल स्टोअर्सला काल मंगळवारी सकाळी आग लागून सुमारे एक कोटी रुपयांची औषधे व इतर सामान जळून खाक झाले. डिचोली अग्निशामक दलाच्या जवानांनी चार तास प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत या आगीत सर्व फार्मसी बेचिराख झाली होती. अग्निशामक दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी संघर्ष करून आग आटोक्यात आणली मात्र मालमत्ता वाचवता आली नाही. या जळालेल्या औषधांची किंमत एक कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगण्यात आले. आग कधी लागली याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी चौकशी सुरू आहे.