एसआयटीसमोर पूजा शर्मा हजर

0
10

आसगाव येथील प्रदीप आगरवाडेकर यांच्या घर मोडतोड प्रकरणातील प्रमुख संशयित पूजा शर्मा हिने रायबंदर येथे गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांसमोर काल हजेरी लावली. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पूजा शर्मा हिला अटकपूर्व जामीन मंजूर करताना गुन्हा अन्वेषण विभागाच्या एसआयटीच्या अधिकाऱ्यांसमोर चौकशीसाठी सोमवारी हजर राहण्याचा निर्देश दिला होता. त्या निर्देशानुसार पूजा शर्मा हिने वकिलांसमवेत तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थिती लावली.