मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची राज्य सरकारला
राज्यातील जिल्हा पंचायत निवडणुकीचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. त्यामुळे राज्य सरकारला राज्यातील मतदारयाद्यांचे विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) पूर्ण होईपर्यंत जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याची विनंती करण्यात आली आहे, अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) संजय गोयल यांनी राज्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसोबत आयोजित बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल दिली.
राज्यात एसआयआरचे काम जोरात सुरू आहे. मतदारयादीत नोंद असलेल्या सर्व मतदारांना एसआयआर अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. पुनरावलोकन अधिकारी (आरओ) आणि साहाय्यक पुनरावलोकन अधिकारी (एआरओ) यांच्याकडून मतदारयादीच्या पुनरावलोकनाची प्रक्रिया केली जात आहे. राज्य सरकारने जिल्हा पंचायत निवडणूक 13 डिसेंबर रोजी घेण्याची तयारी केली आहे. तथापि, अजूनपर्यंत जिल्हा पंचायत निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम जाहीर झालेला नाही.
त्यामुळे एसआयआर पूर्ण होईपर्यंत जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलण्याची सूचना राज्य सरकारला केली आहे. राज्य सरकारने ठरलेल्या वेळी जिल्हा पंचायत निवडून घेतल्यास जिल्हा पंचायत निवडणूक आणि एसआयआरसाठी वेगवेगळ्या पुनरावलोकन अधिकारी (आरओ) आणि साहाय्यक पुनरावलोकन अधिकारी (एआरओ) या अधिकाऱ्याची नियुक्ती करावी लागणार आहे. मतदारयादीचे निश्चित वेळेत पुनरावलोकन पूर्ण व्हावे म्हणून जिल्हा पंचायत निवडणूक पुढे ढकलल्यास कुठलीही अडचण होणार नाही. राज्यातील अंतिम मतदारयादी 7 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केली जाणार आहे, असेही गोयल
यांनी सांगितले.

