एफसी गोवाच्या नवीन होम जर्सीचे अनावरण

0
98

इंडियन सुपर लीग स्पर्धेच्या सहाव्या पर्वासाठी घरच्या मैदानावर होणार्‍या सामन्यांसाठीच्या एफसी गोवा संघाने आपल्या नवीन जर्सीचे अनावरण काल बांबोळी येथील ऍथलेटिक स्टेडियमवर भारताचा यूथ आयकॉन, एफसी गोवचा सहमालक तथा टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याच्या उपस्थितीत करण्यात आले.

या सोहळ्याला एफसी गोवाचे सुमारे ३०००च्या आसपास चाहते उपस्थित होते. या चाहत्यांच्या उपस्थितीत जर्सीचे अनावरण करतानाच एफसी गोवाने त्यांच्या यंदाच्या अभियानाला ‘बी गोवा’ असे नामकरणही दिले. या मोहिमेमुळे एफसी गोव्याच्या फुटबॉल तत्वज्ञानाच्या विचारसरणीला बळकटी मिळणार आहेे, जी एखाद्या विजयाची भावना निर्माण करते आणि खरोखरच सुंदर खेळाची प्रतिमा असलेल्या शैलीने खेळण्याचे धैर्य देणार आहे. ही मोहीम म्हणजे गोमंतकीय वृत्तीचा पुरस्कार करणारी ठरेल. युवा फुटबॉलमधील बदल आणि त्यांच्या युवा विकासाचा प्रबळ कार्यक्रम या माध्यमातून परिवर्तनाचा चेहरा होण्याचे धैर्य या मोहिमेतून दिसून येते. त्यात अनेक युवा खेळाडूंनी पायरी चढताना आणि प्रथम संघात प्रवेश केल्याचे दिसून येते. यंदा जर्सीचा रंग पूर्ण भगवा झाला असून जो गोवा राज्याच्या समुद्रकिनारे आणि सूर्यास्ताची प्रचिती देतो. हा बदल क्लबची गेल्या काही वर्षातील विकास दाखून देतो.

यावेळी जर्सीचे अनावरण केल्यानंतर बोलताना विराट कोहली याने गोव्यात परत येणे आपल्यासाठी आनंदपूर्ण वाटते. येथील चाहते फुटबॉलविषयी इतके भावनावश आणि एफसी गोवासाठी वेडे आहेत. येथे परत येताना मला नेहमीच आशा देते की या देशात क्रीडा संस्कृती खरोखरच साकारली जाऊ शकते. येथील घरांना, कारना क्लबच्या रंगाने सजविले जाते, हे खरोखरच वाखाणण्याजोगे आहे, असे कोहली म्हणाला. एफसी गोवा संघ उत्कृष्ट स्थितीत आहे. गेल्या दोन मोसमापासून ते चमकदार कामगिरी करीत आहेत. त्यांनी सुपर कप जिंकला आहे. जी त्यांच्यासाठीची आणखी एक वैधता होती. अजून बराच पल्ला गाठायचा आहे आणि भारतीय फुटबॉलमधील बदलाचा चेहरा होण्याचे आमचे ध्येय आहे, असे कोहली म्हणाला.

एफसी गोवाची धेंपोवर मात
दरम्यान, जर्सी अनावरण सोहळ्यानंतर खेळविण्यात आलेल्या मोसमपूर्व मित्रत्वाच्या सामन्यात एफसी गोवा संघाने धेंपो स्पोर्ट्‌स क्लबचा ६-० असा एकतर्फी पराभव केला.
बांबोळी ऍथलेटिक स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात एफसी गोवाचा स्टार स्ट्रायकर तथा गेल्या दोन पर्वात ‘गोल्डन बूट’चा मानकरी ठरलेल्या कोरोने हॅट्‌ट्रिक नोंदवित विजयात मोलाचा वाटा उचलला. मोहम्मद अली, मौर्तादा फॉल आणि लिस्टन कुलासो यांनी प्रत्येकी १ गोल नोंदविला.