सरकारने एप्रिल महिन्यापासून शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, त्या निर्णयाविरुद्ध आपण आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात आवाज उठवणार असल्याचे काल गोवा फॉरवर्डचे नेते व फातोर्ड्याचे आमदार विजय सरदेसाई यांनी स्पष्ट केले. रखरखत्या उन्हाळ्यात शाळा सुरू करण्याला आपला विरोध असल्याचे सरदेसाई यांनी स्पष्ट केले. असह्य अशा उकाड्यात विद्यार्थ्यांवर शाळेत येण्याची सक्ती करणे हा सरकारचा चांगला निर्णय म्हणता येणार नसल्याचे सांगून सरदेसाई यांनी सरकारच्या या निर्णयाविषयी तीव्र नापसंती व्यक्त केली. सरकारने याविषयी फेरविचार करायला हवा, असे मतही त्यांनी काल मडगाव येथे बोलताना व्यक्त केले.