एडीबीकडून पाकला मोठी आर्थिक मदत

0
1

आयएमएफनंतर आता आशियाई विकास बँक (एडीबी) पाकिस्तानला तब्बल 800 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत देणार असल्याची माहिती समोर आली आहे. भारताच्या विरोधानंतरही एडीबीनेही हा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान या निधीचा वापर दहशतवादासाठी वित्तपुरवठा करण्याची शक्यता भारताने वर्तवत पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या मदतीला तीव्र आक्षेप घेतला होता; मात्र तरीही आशियाई विकास बँकेने पाकिस्तानसाठी 800 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत मंजूर केल्याने भारतासाठी हा धक्का मानला जात आहे. पाकमधील सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन सुधारण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.