एका वर्गात फक्त १२ विद्यार्थ्यांना अनुमती

0
261

>> दहावी, बारावीसाठी मार्गदर्शक सूचना

येत्या २१ नोव्हेंबर रोजीपासून सुरू होणार असलेल्या १० वी व १२ वी इयत्तेच्या वर्गांसाठी शिक्षण खात्याने काल एसओपी जाहीर केली. त्यानुसार एका वर्गात १२ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना घेतले जाऊ नये. वर्ग मोठ्या खोल्यांत भरवले जावेत.

खात्याने वरील वर्ग सुरू करण्यापूर्वी सर्व वर्ग, प्रयोगशाळा व विद्यालयातील सर्व अन्य सुविधांचे सेनिटायझेशन केले जावे असे म्हटले आहे. ज्या विद्यालयांचा क्वारंटाईन सेंटर्स म्हणून वापर करण्यात आला होता त्या विद्यालयांचे सॅनिटायझेशन करण्याबरोबरच ती विद्यालये स्वच्छ करून धुवावीत असे म्हटले आहे. एअर कंडिशनची सोय असल्यास त्याची रेंज २४ ते ३० डि.से. ठेवण्यात यावी, अशी सूचना करण्यात आली आहे.

व्यायामशाळांसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या एसओपीचा वापर करावा. विद्यार्थ्यांच्या लॉकर सेवेच्या वापरण्याच्या वेळी योग्य ते सामाजिक अंतर पाळले जावे.