एअर मार्शल व्ही. आर. चौधरी होणार हवाई दल प्रमुख

0
57

एअर चीफ मार्शल आरकेएस भदौरिया यांच्या सेवानिवृत्तीनंतर एअर मार्शल व्ही. आर. चौधरी हे ३० सप्टेंबरला हवाई दल प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारतील. चौधरी सध्या भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख आहेत. एअर मार्शल चौधरी यांचा २ डिसेंबर १९८२ मध्ये भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विभागात समावेश करण्यात आला होता आणि त्यांनी विविध स्तरांवर विविध कमांड, कर्मचारी आणि निर्देशात्मक नेमणुका केल्या आहेत, अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली.

एअर मार्शल चौधरी यांना आतापर्यंत सेवेदरम्यान परम विशिष्ट सेवा पदक, अति विशिष्ट सेवा पदक आणि वायु सेना पदक देण्यात आले आहे. एअर चीफ मार्शल भदौरिया हे ३० सप्टेंबर २०१९ मध्ये हवाई दल प्रमुख झाले होते. आता भदौरिया हे या महिन्याच्या ३० तारखेला निवृत्त होतील. गेली दोन वर्षे ते हवाई दलाचे प्रमुख होते. एअर मार्शल चौधरी यांना ३,८०० तासांहून अधिक