उसगाव अपघातात दुचाकीचालक जखमी

0
2

गांजे-उसगाव येथे शुक्रवारी दुपारी टेम्पो व दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात सतीश तुळशीदास नाईक (35, रा. पाडेली-सत्तरी) हा दुचाकीचालक जखमी झाला. त्याच्यावर सध्या गोमेकोत उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दुचाकीचालक सतीश नाईक फोंड्याच्या दिशेने जात होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या टेम्पोची धडक दुचाकीला बसली. जखमीला पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केल्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत नेण्यात आले.