उरीमध्ये एक दहशतवादी ठार, एकास घेतले ताब्यात

0
59

जम्मू-काश्मीरमधील उरी भागातील भारतीय लष्कराच्या विशेष मोहिमेत १८ वर्षांच्या एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात आले तर एका घुसखोराचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. उरी आणि ताबा रेषेवरच्या अन्य जवळच्या भागांत सुरू असलेला घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी लष्कराने विशेष मोहीम हाती घेतली होती. ती १८-१९ सप्टेंबर रोजी सुरू झाली होती. लष्कराच्या सूत्रांनी रविवार दि. २६ रोजी दोन घुसखोर मारले गेले असण्याची शक्यता असून, त्यांचे मृतदेह अद्याप सापडलेले नाहीत. या चकमकीत चार जवानही जखमी झाले असल्याचे म्हटले आहे.

लष्कर ए तोयबा संघटनेच्या सहा दहशतवाद्यांनी पाकिस्तानच्या जब्री या ठाण्याच्या सर्वसाधारण प्रदेशातून घुसखोरीचा प्रयत्न केला. घुसखोरीचा प्रयत्न सुरू असताना पॅट्रोलिंग करणार्‍या जवानांशी संपर्कात आल्यावर चार दहशतवादी ताबा रेषेवरून पाकव्याप्त काश्मिरात पळून गेले. तर दाघांनी भारतात प्रवेश केला. त्यातील एकाला ठार केले तर एकाला जिवंत ताब्यात घेतल्याचे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले.