उपांत्य फेरीतच भारत गारद

0
89

>> न्यूझीलंड अंतिम फेरीत दाखल

>> मॅट हेन्रीचा भेदक मारा

पावसाच्या व्यत्ययामुळे आरक्षित दिवशी खेळवल्या गेलेल्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील रोमहर्षक उपांत्य सामन्यामध्ये काल भारताचा १८ धावांनी पराभव झाला. भारतीय संघाला न्यूझीलंडने उभारलेल्या २४० धावांचे किरकोळ आव्हान पार करण्यात अपयश आले. टीम इंडियाचा डाव २२१ धावांत संपल्याने न्यूझीलंडने अंतिम फेरीत प्रवेश केला. मॅट हेन्रीने आघाडी फळी कापून काढल्यानंतर रवींद्र जडेजा (७७) व महेंद्रसिंग धोनी (५०) यांनी केलेली शतकी भागीदारीदेखील भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही.

इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची ३ बाद ५ अशी केविलवाणी स्थिती झाली. रोहित, राहुल व विराट हे त्रिकुट प्रत्येकी एक धाव करून बाद झाले. पाचव्या स्थानावर बढती मिळालेल्या दिनेश कार्तिकने २५ चेंडूंत केवळ ६ धावा जमवून तंबूची वाट धरली. यावेळी फलकावर केवळ २४ धावा लागल्या होत्या. सुरुवातीला संयम राखून खेळल्यानंतर पंतने फिरकीपटू सेंटनरला मैदानाबाहेर भिरकावण्याच्या नादात आपली विकेट फेकली. ३१व्या षटकांत पंड्या परतला तेव्हा फलकावर केवळ ९२ धावा लागल्या होत्या. जडेजा व धोनी यांनी यानंतर सातव्या गड्यासाठी ११६ धावांची भागीदारी रचून भारताला विजयाच्या दिशेने नेले. वाढत चाललेली आवश्यक धावगती कमी करण्याच्या प्रयत्नात जडेजा व यानंतर गप्टिलच्या थेट फेकीवर धोनी धावबाद झाल्यानंतर भारताचा पराभव निश्‍चित झाला. तत्पूर्वी, न्यूझीलंडने ६ बाद २११ धावांवरून काल पुढे खेळताना २३९ धावांपर्यंत मजल मारली.

धावफलक
न्यूझीलंड ः मार्टिन गप्टिल झे. कोहली गो. बुमराह १, हेन्री निकोल्स त्रि. गो. जडेजा २८, केन विल्यमसन झे. जडेजा गो. चहल ६७, रॉस टेलर धावबाद ७४, जिमी नीशम झे. कार्तिक गो. पंड्या १२, कॉलिन डी ग्रँडहोम झे. धोनी गो. भुवनेश्‍वर १६, टॉम लेथम झे. जडेजा गो. भुवनेश्‍वर १०, मिचेल सेंटनर नाबाद ९, मॅट हेन्री झे. कोहली गो. भुवनेश्‍वर १, ट्रेंट बोल्ट नाबाद ३, अवांतर १८, एकूण ५० षटकांत ८ बाद २३९
गोलंदाजी ः भुवनेश्‍वर कुमार १०-१-४३-३, जसप्रीत बुमराह १०-१-३९-१, हार्दिक पंड्या १०-०-५५-१, रवींद्र जडेजा १०-०-३४-१, युजवेंद्र चहल १०-०-६३-१
भारत ः लोकेश राहुल झे. लेथम गो. हेन्री १, रोहित शर्मा झे. लेथम गो. हेन्री १, विराट कोहली पायचीत गो. बोल्ट १, ऋषभ पंत झे. डी ग्रँडहोम गो. सेंटनर ३२, दिनेश कार्तिक झे. नीशम गो. हेन्री ६, हार्दिक पंड्या झे. विल्यमसन गो. सेंटनर ३२, महेंद्रसिंग धोनी धानबाद ५०, रवींद्र जडेजा झे. विल्यमसन गो. बोल्ट ७७, भुवनेश्‍वर कुमार त्रि. गो. फर्ग्युसन ०, युजवेंद्र चहल झे. लेथम गो. नीशम ५, जसप्रीत बुमराह नाबाद ०, अवांतर १६, एकूण ४९.३ षटकांत सर्वबाद २२१
गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट १०-२-४२-१, मॅट हेन्री १०-१-३७-३, लॉकी फर्ग्युसन १०-०-४३-१, कॉलिन डी ग्रँडहोम २-०-१३-०, जिमी नीशम ७.३-०-४९-१, मिचेल सेंटनर १०-२-३४-२