उपवन संरक्षकांना पूर्वपरवानगीने रानडुकराच्या शिकारीस मान्यता

0
50

राज्य सरकारने राज्यातील पीकांचे संरक्षण करण्यासाठी रानडुकराची पूर्वपरवानगीने शिकार करण्यास मान्यता दिली आहे. यासंबंधीचा आदेश वनसंरक्षक संतोष कुमार यांनी काल जारी केला. रानडुकराची शिकार करण्यासाठी सशर्त परवानगी देण्याचा अधिकार उपवन संरक्षकांना देण्यात आला आहे. रानडुक्कर, मोर, गवेरेडे यांना उपद्रवी प्राणी घोषित करण्याची मागणी शेतकरी करत होते. शिकार केल्यावर रानडुक्कर ही सरकारी मालमत्ता बनेल. त्याची कायद्यानुसार विल्हेवाट लावली जाणार आहे.