उद्योगपती राज कुंद्रा यांना मुंबई पोलिसांकडून अटक

0
112

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि प्रसिद्ध उद्योगपती राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे. सोमवारी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबई पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी अश्लील चित्रपटांची निर्मिती करून ऍप्सवर प्रदर्शित करणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. याच प्रकरणात राज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. अश्लील चित्रपटांची निर्मिती करणे आणि ते प्रदर्शित करण्याच्या आरोपाखाली राज कुंद्रा यांना अटक करण्यात आली आहे.