उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता

0
43

सध्या पावसाने उसंत घेतलेली असून राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कडक ऊनही हजेरी लावू लागलेले आहे. तसेच तापमानातही वाढ झालेली आहे. मात्र, उद्या १९ सप्टेंबरनंतर पुन्हा राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केलेली आहे.

ऐन चतुर्थी सणाच्या दिवसांत पावसाने राज्यात जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे त्याचा गणेश चतुर्थी सणावर परिणाम झाला होता. मात्र, सध्या राज्यात पावसाला पोषक असे वातावरण नसल्याने रविवारनंतरच राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
गुरूवारी पावसाने उसंत घेतली होती. गेल्या एक-दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत तुरळक पावसाची हजेरी होती. राज्यात सध्या मान्सुनसाठी पोषक असे वातावरण नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मात्र, अरबी समुद्रातून जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

या पार्श्‍वभूमीवर आता राज्यात उष्मा वाढलेले आहे. आता उद्या रविवारनंतर परत राज्यात पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.