उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदी स्नेहा गीते यांची नियुक्ती

0
9

राज्य सरकारने उत्तर गोवा जिल्हाधिकारीपदी आयएएस अधिकारी स्नेहा गीते यांची नियुक्ती काल केली आहे. त्यांच्याकडे गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकारणाऱ्याच्या सदस्य सचिवपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी मामू हागे (आयएएस) यांना राज्य प्रशासनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यांची अरुणाचल प्रदेश येथे बदली झालेली आहे. राज्याचे शिक्षण सचिव प्रसाद लोलयेकर (आयएएस) यांच्याकडे दक्षता संचालक म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. सार्वजनिक गाऱ्हाणी खात्याचे संचालक प्रसाद वळवईकर यांच्याकडे पशुसंवर्धन खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे.