>> राहुल गांधींना घेतले ताब्यात; सोनिया गांधींची आज पुन्हा चौकशी
नॅशनल हेराल्ड कथित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात सक्तवुसली संचलनालय अर्थात ईडीकडून कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची चौकशी सुरू असून, त्या विरोधात काल देशभरात कॉंग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आले. नवी दिल्लीतील आंदोलनात सहभागी झालेल्या राहुल गांधींना काल पोलिसांनी ताब्यात घेतले.
सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचालनायकडून चौकशी सुरू असून, याविरोधात पक्षाकडून देशभरात आक्रमक आंदोलन करण्यात आले. याआधी २१ जुलैला ईडीने सोनिया गांधींची दोन तास चौकशी केली होती. त्यानंतर काल त्यांची पुन्हा एकदा ६ तास चौकशी झाली. त्यावेळी त्यांना जवळपास ३९ प्रश्न विचारण्यात आले. बुधवारी पुन्हा एकदा त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे.
राहुल गांधी राजपथ मार्गावर रस्त्यावर बसून आंदोलन करत असताना पोलिसांनी त्यांना घेरले होते. जवळपास अर्धा तास राहुल गांधी आंदोलन करत होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना उचलून ताब्यात घेतलेल्या इतर नेत्यांसोबत बसमधून नेले. त्यानंतर रात्री उशिरा त्यांना सोडून देण्यात आले.