सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल मुंबईत 15 ठिकाणी छापेमारी केली. कोरोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी हे छापे टाकण्यात आले असून, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला. या प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी 38 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून, त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता.