इस्पितळांसाठी औषध खरेदीप्रश्‍नी विश्‍वजीत राणे आक्रमक

0
123

औषध खरेदीत घोटाळ्याचा आरोप
स्वस्त दरात औषधे मिळावीत म्हणूनच आपण माजी मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने आरोग्यमंत्री असताना एकाच निविदेद्वारे सर्व इस्पितळांसाठी औषधे खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी काल विधानसभेत वाळपईचे आमदार विश्वजीत राणे यांच्या प्रश्‍नावर सांगितले. राणे यांनी औषध खरेदी प्रकरणी घोटाळा झाल्याचा आरोप करून त्याची निवृत्त न्यायाधिशांतर्फे चौकशी करण्याची जोरदार मागणी केली होती. या विषयावर राणे यांनी विद्यमान आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनाही फैलावर घेतले.या विषयावर राणे यानी बराच आवाज चढविला. वरील निर्णयामुळे गेले १८ महिने गोवा वैद्यकीय महाविद्यालयात रुग्णांना औषधे बाहेरून आणावी लागत आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना त्याचा त्रास होत असल्याचे राणे यांनी सांगितले. एकाच निविदेद्वारे औषधे खरेदी करण्याचे बंद करण्याचे आवाहन राणे यांनी केले. निविदा प्रक्रियेत पुन्हा पुन्हा दुरुस्त्या करण्याच्या प्रश्‍नावर वाळपईच्या आमदारांनी आरोग्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांना फैलावर घेतले. तातडीच्यावेळीही इस्पितळात औषधे उपलब्ध होत नसल्याचे त्यांनी सांगितले.