पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे प्रमुख इम्रान खान यांना सिफर प्रकरणात न्यायालयाने 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनाही 10 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खान आणि महमूद कुरैशी यांच्या विरोधातील सिफर प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. इम्रान खान यांनी अत्यंत गोपनीय माहिती ही सार्वजनिक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.