आर्लेकर यांचा आज शपथविधी

0
98

>> हिमाचल प्रदेशला रवाना; मुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा

हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेले भाजपचे ज्येष्ठ नेते, गोव्याचे माजी मंत्री, माजी सभापती राजेंद्र आर्लेकर यांचा आज सकाळी १० वाजता शिमला येथील राजभवनावर शपथविधी सोहळा होणार आहे. हिमाचल प्रदेशचे २१वे राज्यपाल म्हणून ते शपथ घेतील. आर्लेकर हे काल दुपारी हिमाचल प्रदेशला रवाना झाले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व भाजपच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी वास्को येथील त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गेल्या मंगळवारी देशातील आठ राज्यांच्या नवीन राज्यपालांची नावे जाहीर केली होती. त्यात राजेंद्र आर्लेकर यांचाही समावेश होता.

हिमाचल प्रदेशचे नवनियुक्त राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा शपथविधी आज संपन्न होणार आहे. हिमाचलचे माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे देहावसान झाल्यामुळे हा शपथविधी तीन दिवसांनी पुढे ढकण्यात आला होता. या शपथविधीसाठी आर्लेकर हे काल दुपारी दाबोळी येथून विमानाने पत्नीसमवेत चंदीगढला रवाना झाले. तेथून त्यांनी नंतर हेलिकॉप्टरने शिमलाकडे प्रयाण केले.