आर्यन खानसह एकूण तिघांना गुरूवारपर्यंत एनसीबी कोठडी

0
30

केंद्रीय अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) रविवारी अटक केलेल्या अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन याच्यासह इतर दोघांना न्यायालयाने ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडी सुनावली आहे. रविवारी आर्यनसह आठ जणांना प्रवासी जहाजावर अमली पदार्थ घेऊन गेल्याप्रकरणी रविवारी अटक केली होती. काल सोमवारी आर्यनसह इतर सात आरोपींना मुंबईतील किला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यावेळी न्यायालयाने आर्यन खानबरोबरच मुनमुन धमेच्या व अरबाज सेठ मर्चंट यांनाही सात ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली. इतर आरोपींबाबतदेखील लवकरच निर्णय होणार आहे.

दरम्यान, आर्यन खानकडून वकील सतीश मानशिंदे यांनी बाजू मांडली. तर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी एनसीबीकडून बाजू मांडली. आर्यनच्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह व धक्कादायक फोटो स्वरूपातील माहिती आढळल्याचे समोर आल्याचे एनसीबीने म्हडटले आहे. दरम्यान, आर्यनच्या फोन चॅटमध्ये बर्‍याच गंभीर स्वरूपातील लिंक आढळून आल्या आहेत, ज्यांचा संबंध आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटशीदेखील असण्याची शक्यता आहे.