आयपीएलची रणधुमाळी आजपासून

0
201

>> मुंबई इंडियन्स- रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमनेसामने

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी-ट्वेंटी स्पर्धेला आजपासून विद्यमान विजेता मुंबई इंडियन्स व रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यातील सामन्याने होणार आहे. मुंबई व बंगलोर यांच्यातील शेवटच्या दहा पैकी आठ सामन्यांत मुंबईने बाजी मारली आहे. पण, मुंबईच्या संघाने आयपीएलमधील मागील आठही मोसमात आपली सलामीची लढत गमावली आहे. त्यामुळे आकडेवारी व इतिहासाला फारसे महत्त्व नसेल. सामने त्रयस्थ ठिकाणी तसेच प्रेक्षकांविना होणार असल्याने ‘होम एडव्हांटेज’ किंवा मैदानावरील ‘फॅन क्लब’ हे प्रकार यंदाच्या मोसमात दिसणार नाहीत. सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई सुपर किंग्ज व राजस्थान रॉयल्स हे स्पर्धेतील अन्य सहभागी संघ आहेत.

चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर आजचा सामना रंगणार आहे. हे मैदान सुपरकिंग्जचा बालेकिल्ला मानले जाते. परंतु, आज भिन्न शैलीच्या संघांमध्ये स्पर्धेतील फिरकीला सर्वांत पोषक अशी खेळपट्टी असलेल्या मैदानावर दिग्गज संघांचा कस लागणार आहे. मागील दोन वर्षांत आयपीएलमध्ये या मैदानावर फिरकी गोलंदाजांनी १९.५२च्या सरासरीने व केवळ ६.१६च्या इकॉनॉमीने बळी घेतले आहेत. त्यामुळे पहिल्याच सामन्यात दोन्ही संघतीन-तीन फिरकीपटूंसह उतरल्यास वावगे वाटण्याचे कारण नसेल. स्पर्धेतील हा पहिलाच सामना असल्याने या सामन्यातील विजेत्याबद्दल, संघ समतोलाबद्दल तसेच वातावरणाबद्दल भाकित करणे धाडसाचे ठरू शकते. परंतु, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने ग्लेन मॅक्सवेल व डॅन क्रिस्टियन यांना समावेश करून आपल्या सहाव्या किंवा सातव्या गोलंदाजाची दीर्घकालीन समस्या सोडवल्याचे दिसते. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर सलामीवीर देवदत्त पडिकल याच्या सलग दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे तो निवडीसाठी उपलब्ध आहे. ऍडम झॅम्पा व फिन ऍलन यांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झालेला नसल्यामुळे ते निवडीसाठी उपलब्ध नसतील. विराटसह देवदत्त पडिकल डावाची सुरुवात करू शकतो. नवदीप सैनी व युजवेंद्र चहल यांचा टी-ट्वेंटी फॉर्म सध्या खराब आहे. भारतीय संघातील जागा राखणे देखील दोघांना जमलेले नाही. कसोटी क्रिकेट गाजवलेला न्यूझीलंडला उंचपुरा काईल जेमिसन टी-ट्वेंटीमध्ये अजून रुळलेला नसल्याचे त्याच्या आकडेवारीवरून तरी दिसते. त्यामुळे बंगलोरला सुरुवात कशी मिळते यावर सर्वकाही अवलंबून असेल.

दुसरीकडे क्विंटन डी कॉक व ऍडम मिल्ने ही दुकली ‘क्वारंटाइन’ंमध्ये असल्या कारणाने आजच्या सामन्यासाठी त्यांचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे ईशान किशनवर यष्टिरक्षणाची मुंबईच्या जबाबदारी असेल. किमान आजच्या सामन्यासाठी तरी मुंबईच्या आघाडी फळीतील सर्व फलंदाज भारतीय असतील. विशेष म्हणजे त्यांच्या आघाडी फळीतील सर्व फलंदाज भारताच्या मागील मालिकेत नुसते खेळलेच नव्हते. तर आपल्या कामगिरीने प्रभावितही केले होते. त्यामुळे मुंबई संघाचा आत्मविश्‍वास उंचावला आहे. पोलार्डच्या साथीला जिमी नीशम आल्याने तसेच त्यांच्या जोडीला कृणाल पंड्या असल्याने मुंबईला डेथ ओव्हर्समध्ये फलंदाजीची चिंता नसेल. गोलंदाजीतही बुमराह, बोल्ट या दुकलीवर त्यांची मदार असेल.