आयएसआय प्रमाणित हेल्मेट न वापरणार्या दुचाकी वाहनचालकांवर कारवाईचा आदेश वाहतूक पोलीस अधीक्षकांनी अधिकार्यांना दिला आहे.
राज्यात नवीन वाहतूक दंड शुल्कांची अंमलबजावणी केली जात आहे. हेल्मेटचा वापर न करणार्या दुचाकीचालकाला १ हजार रुपये दंड ठोठावला जात आहे. त्यामुळे बहुतांश दुचाकीचालक हेल्मेट वापरत आहेत; मात्र काहीजण आयएसआय प्रमाणित हेल्मेटचा वापर करत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे असे हेल्मेट न वापरणार्यांवर कारवाईचे निर्देश दिले आहेत.