Home बातम्या आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी

आमदार अपात्रता याचिकेवर सुनावणी

0

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गिरीश चोडणकर यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आमदार अपात्रता प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात काल सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने 4 महिन्यांपूर्वी मार्चमध्ये प्रतिवादींना नोटीस बजावली आहे; पण प्रतिवादींनी नोटीसला कोणतेही उत्तर दाखल केलेले नाही, असा युक्तिवाद गिरीश चोडणकर यांच्या वकिलांनी न्यायालयात केला. गिरीश चोडणकर यांनी कॉँग्रेस पक्षातून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या आठ आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली आहे. या याचिकेत गोवा विधानसभेच्या सभापतींना प्रतिवादी केले आहे.