आमदार अपात्रता आव्हान याचिकेवर विशेष खंडपीठासमोर होणार सुनावणी

0
127

कॉंग्रेसच्या १० आमदारांविरोधातील अपात्रता याचिका फेटाळण्याच्या सभापतींच्या निवाड्याविरोधात प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी जी आव्हान याचिका दाखल केली आहे, त्यावरील सुनावणी आता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाच्या विशेष विभाग खंडपीठासमोर होणार आहे. या खटल्याची पुढील सुनावणी आता पुढील आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

सभापती राजेश पाटणेकर यांनी १० कॉंग्रेस आमदारांच्या अपात्रता याचिका याचिका फेटाळून लावली होती. या निवाड्याला प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.
काल न्यायमूर्ती एम. के. सोनक यांनी या खटल्यावरील सुनावणी घेण्यास नकार देताना या खटल्यातील जे प्रतिवादी आहेत, त्यापैकी काही जणांची यापूर्वी आपण न्यायालयात वकील म्हणून बाजू मांडलेली आहे, असे सांगून या खटल्याचे न्यायाधीश म्हणून कामकाज हाताळण्यास त्यांनी नकार दिला.कॉंग्रेसच्यावतीने युक्तिवाद करण्यासाठी वरिष्ठ वकील कपिल सिब्बल हे उपस्थित होते, तर सभापती राजेश पाटणेकर यांच्यावतीने भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता हे हजर होते. ही सुनावणी आभासी पद्धतीने झाली.