आपत्ती व्यवस्थापनाकडून विविध ठिकाणी मॉक ड्रील

0
5

गोवा सरकारच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सहकार्याने राजधानी पणजीसह कोलवा, कळंगुट, वास्को येथील आयओसीएल, तसेच एचपीसीएल टर्मिनल्सवर चक्रीवादळ व त्यानंतर उद्भवणारी आपत्ती याला सामोरे जाण्यासाठीचे मॉक ड्रील काल घडवून आणले. त्यानिमित्त वाहनांची तपासणी करण्याबरोबरच, बोटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना वाचवणे, वैद्यकीय आणीबाणीची स्थिती निर्माण झाली, तर ती कशी हाताळावी याचा सराव करण्यात आला. राज्य सरकारचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, अग्निशामक दल, कॅप्टन ऑफ पोर्ट्स खाते आदींनी या मॉक ड्रीलमध्ये भाग घेतला. यानिमित्त वास्को व पणजी जेटी, पर्वरी येथील कदंब महामंडळाचा डेपो आदी ठिकाणीही मॉक ड्रील संपन्न झाले. या मॉक ड्रीलमध्ये विशेष करून चक्रीवादळ व त्यामुळे निर्माण होणारी नैसर्गिक आपत्तीची स्थिती हाताळणे यावर भर देण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.