आतापर्यंत ३५ कोटी नागरिकांना लस

0
124

>> देशात कोविड प्रतिबंधक लसीकरणाचे १६९ दिवस पूर्ण

>> केंेद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

देशात लसीकरण मोहिमेने वेग घेतल्याचे दिसत आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार लसीकरणाचे १६९ दिवस पूर्ण झाले असून या दिवसांत ३५ कोटींहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. दि. १६ जानेवारीपासून देशात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली होती. सरकारी आकड्यांनुसार गेल्या २४ तासांत ६३,८७,८४९ जणांना डोस देण्यात आले तर आतापर्यंत देशात एकूण ३५.१२ कोटी नागरिकांनी लस घेतली आहे.

लसीकरण मोहीम सुरू होऊन १६९ दिवस पूर्ण झाले आहेत. या दिवसांत देशात ३५ कोटी लशीचे डोस देण्यात आले आहेत. दि. १६ जानेवारीपासून सरू झालेल्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत केवळ १६९ दिवसांत कोरोना व्हॅक्सिनचे एकूण ३५ कोटी डोस देण्यात आले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ३५.१२ कोटी नागरिकांना लशीचे डोस देण्यात आले. केवळ शनिवारी शनिवारी रात्री ११ वाजेपर्यंत एकाच दिवशी ६३.३९ लोकांनी आतापर्यंत लोकांनी कोरोना लस घेतली आहे.

४१.८२ कोटी चाचण्या
देशात कोरोनाचा प्रसार थोपवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातील एक प्रयत्न म्हणजे लसीकरण असून देशात कोरोनाच्या चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. शनिवारपर्यंत देशात एकूण ४१.८२ कोटी चाचण्या झाल्या आहेत. दुसरी लाट ओसरत असताना देशातील कोरोना लसीकरणही वेगाने सुरू आहे.

१८-४४ वयोगटाला १० कोटी लस
लसीकरणाचा सध्या देशात चालू असलेल्या १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांचे १० कोटींहून अधिक लसीकरण झाले आहे. ३७ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात या वयोगटातील १०.२१ कोटी लोकांनी पहिला डोस घेतला आहे. आठ राज्य उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राज्यस्थान, गुजरात, तमिळनाडू, बिहार, कर्नाटक आणि महाराष्ट्रात हा आकडा ५० लाखांहून अधिक आहे. या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश, आसाम, छत्तीसगड, दिल्ली, हरियाणा, झारखंड, केरळ, तेलंगणा, हिमाचल प्रदेश, ओडिशा, पंजाब, उत्तराखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये १८ ते ४४ वयोगटातील १० लाखांहून अधिक लोकांनी लस घेतली आहे.

दररोज एक कोटींचे लक्ष्य
देशात तिसर्‍या लाटेचा धोका असल्याचे देशातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशात सर्वांच्या व्हॅक्सिनेशनसाठी ६ ते ८ महिन्यांचा कालावधी आहे. येणार्‍या दिवसात प्रत्येक दिवशी १ कोटी डोस देण्याचे केंद्र सरकारचे लक्ष्य आहे. केंद्र सरकारने डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवले आहे.

गोव्यात ३१ जुलैपर्यंत
सर्वांना पहिला डोस

गोव्यात येत्या ३१ जुलैपर्यंत सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले आहे. त्यानुसार गोव्यातही टिका महोत्सवाद्वारे जागृती करून हे उद्दिष्ट गाठले जाण्यासाठी वेगाने लसीकरणाची मोहीम राबवली जात आहे.

तिसर्‍या लाटेचा धोका
वेळीच कोरोना नियमांचे पालन न केल्यास देशाला तिसर्‍या लाटेचा धोका असून ही लाट येत्या ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये येऊ शकते असा इशारा वैज्ञानिकांनी दिला आहे. वैज्ञानिक म्हणाले की, कोरोनाचा नवीन प्रकार आढळून आल्यास तिसरी लाट अत्यंत धोकादायक असू शकते. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे सदस्य मनिंद्र अग्रवाल यांनी, तिसर्‍या लाटेचा अचूक अंदाज लावण्यासाठी रोग प्रतिकारशक्ती कमी होणे, लसीकरणाचे परिणाम आणि अधिक धोकादायक स्वरुप या शक्यता आहेत. जर कोरोनाच्या व्हेरिएंटमध्ये कोणताही बदल झाला तर ऑक्टोबर ते नोव्हेंबरदरम्यान कोरोना पुन्हा एकदा डोके वर काढेल. त्यावेळी देशात १,५०,००० ते २,००,००० पर्यंत रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यताही अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.