राज्य सरकारच्या नगरनियोजन विभागाने प्रादेशिक आराखडा (आरपीजी) 2021 मधील आणखी सुमारे 10,093 चौरस मीटर जमिनीचे सेटलमेंट झोनमध्ये रूपांतर केले आहे. नगरनियोजन विभागाने आरपीजी – 2021 मध्ये भातशेती, सिंचन क्षेत्रासह संरक्षित राखीव वन असलेल्या दक्षिण गोव्यातील नुवे, रिवण आणि कामुर्लीमधील सुमारे 10,093 चौरस मीटर एवढी जमीन ‘दुरुस्त’ केली आहे. नुवे येथील भातशेती म्हणून निश्चित केलेली 4704 चौरस मीटर जमीन, रिवण येथील संरक्षित वनक्षेत्र निश्चित केलेली 5000 चौरस मीटर जमीन आणि कामुर्ली सासष्टी येथील ऑर्चड निश्चित केलेली सुमारे 389 चौरस मीटर जमिनीचे सेटलमेंट झोन म्हणून दुरुस्त करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली.