पर्यटन खात्याच्या ऑनलाइन सेवांचे उद्घाटन सोमवार २ मे रोजी करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी दिली. राज्यातील हॉटेल, साहसी खेळ व इतर पर्यटन सेवांना प्रोत्साहन देण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे. पर्यटन खात्यात कालबद्ध सेवा वितरण कायद्याच्या अंमलबजावणीला प्राधान्य दिले जाणार आहे, असेही मंत्री खंवटे यांनी सांगितले.