आंतरराष्ट्रीय पर्यटकांसाठी पोर्टल सुरू

0
146

केंद्र सरकारच्या, पर्यटन मंत्रालयाने ३१ मार्चला ’डींीरपवशव ळप खपवळर’ ‘हे पोर्टल सुरू केले. पर्यटन मंत्रालय, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या  समन्वयाने आणि राज्य सरकारी अधिकार्‍यांच्या मदतीने यांची दखल घेत आहे. पाहुण्या पर्यटकांना येणार्‍या समस्यांविषयी मंत्रालय, संबंधित दूतावासांशीही समन्वय साधत आहे. परदेशी पर्यटकांकडून बहुतांश विचारणा, त्यांच्या स्वदेशी परतण्याबाबत माहिती मिळवण्यासाठी करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर त्यांना मायदेशी परतता येत नसल्यामुळे, भारतात राहण्यासाठी व्हिसाची मुदत वाढवण्याबाबत आहेत.

लॉक डाऊन संपल्यानंतर,विमानाने मायदेशी परतण्यासाठी दिल्ली, मुंबई यासारख्या महानगरापर्यंत प्रवास  करण्यासंदर्भातही या पाहुण्यांनी विचारणा केली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी पर्यटन मंत्रालय, राज्य अधिकार्‍यांसमवेत काम करत आहे. वयोवृद्ध परदेशी पर्यटकांच्या, अन्न, औषधे, शुश्रुषा यासंदर्भातील विनंतीकडे तात्काळ लक्ष पुरवण्यात येत आहे. १३६३ या अहोरात्र सुरु असणार्‍या मदत क्रमांकावरही पर्यटकांना, अचूक आणि अद्ययावत माहिती पुरवण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी ीींीरपवशवळपळपवळर.लेा  किंवा ळपलीशवळलश्रशळपवळर.ेीस या संकेतस्थळाला भेट द्यावी.