अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातातील मृतांची संख्या 275 पर्यंत पोहोचली असून रविवारी सकाळपर्यंत 248 मृतदेहांचे डीएनए नमुने घेण्यात आले. त्यापैकी 31 मृतदेह जुळले आहेत, त्यापैकी 20 मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात आले आहेत. उर्वरित मृतदेहांचे नातेवाईक येण्याची प्रतीक्षा असून ते आल्यावर उरलेले मृतदेह त्यांच्याकडे सोपवले जातील. अहमदाबाद विमान अपघातात प्राण गमावलेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे डीएनए जुळले आहेत. त्यांचा मृतदेह कुटुंबियांना सोपवण्यात येईल आणि राजकोटमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
मृतांची संख्या 275
रुग्णवाहिकांद्वारे मृतदेह सुरक्षिततेसह त्यांच्या गावी नेले जात आहेत. यासाठी 230 पथके तयार करण्यात आली आहेत, जी मृतांच्या नातेवाईकांशी थेट संपर्कात आहेत. 192 रुग्णवाहिका आणि वाहने सज्ज आहेत. अपघातात प्राण गमावलेल्या 11 परदेशी नागरिकांचे नातेवाईक आज अहमदाबादला पोहोचू शकतात.