असंसदीय शब्दांची यादी जाहीर

0
37

संसदेचे पावसाळी अधिवेशन १८ जुलैपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या आधी लोकसभा आणि राज्यसभेतील खासदारांसाठी असंसदीय शब्दांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या असंसदीय शब्दांना लोकसभा आणि राज्यसभेत वापरणे असंसदीय मानले जाणार आहे. लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द २०२१ या शीर्षकासह ही यादी प्रकाशित केली आहे.

गद्दार, शकुनी, जयचंद, भ्रष्ट यासह अनेक शब्द वापरण्यावर आता संसदेत निर्बंध असणार आहेत. मात्र लोकसभा सचिवालयाच्या निर्णयावर विरोधी पक्षातील नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. जुमलाजीवी, कोरोना स्प्रेडर, जयचंद, भ्रष्ट, बाल बुद्धी, स्नूपगेट, शर्म, दुर्व्यवहार, विश्वासघात, ड्रामा, पाखंड, शकुनी, जयचंद, लॉलीपॉप, चांडाल चौकडी, गुल खिलाए, कमीना, काला सत्र, दलाल, खून की खेती, दोहरा चरित्र, निकम्मा, नौंटकी, छोकरा, खालिस्तानी, विनाश पुरुष, तानाशाही, तानाशाह, गद्दार, अपमान, अहंकार अशा शब्दांवर बंदी घातली आहे.