अमित शहांना कोरोना

0
220

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण झाली आहे. अमित शाह यांनी स्वत: ट्विट करून ही माहिती दिली. कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्यानंतर आपण चाचणी केली असता, आपला अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे त्यांनी नमूद केले आहे. रुग्णालयात दाखल होवून आपण उपचार घेणार असल्याचे ते म्हणाले.
माझी तब्येत ठीक आहे, मात्र डॉक्टरांच्या सल्ल्‌यानुसार मी रुग्णालयात भरती होत आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात जे लोक आले होते, त्यांनी कोरोनाची टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.