अपघातात जखमी एका इसमाचा मृत्यू

0
4

झुआरी पुलावर बुधवारी संध्याकाळी 6 वाजता दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात जखमी अन्वर सय्यद (रा. मडगाव) याचे बांबोळी येथील गोमेकॉमध्ये काल निधन झाले. आगशी पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेला दुचाकी चालक हेमंत सी. टी. (रा. हुबळी – कर्नाटक) याच्याविरोधात वाहन निष्काळजीपणे चालविल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.