अध्यात्मिक पर्यटनाला चालना देणार ः खंवटे

0
42

राज्यातील आध्यात्मिक पर्यटनाला चालना देण्यात येणार असून महिन्याभरात आध्यात्मिक सर्किटची घोषणा करण्यात येणार आहे, अशी माहिती काल पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी पर्यटन उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पर्यटनमंत्री खंवटे यांनी अकराव्या पर्यटन उच्चाधिकार समितीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. गोव्यात योग आणि वेलनेस पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्याच दृष्टीकोनातून महिन्याभरात अध्यात्मिक सर्किटची घोषणा केली जाणार आहे. राज्यात क्रीडा पर्यटनाला चालना दिली जाणार आहे, असे सांगितले.

पर्यटन खात्याकडून राज्यभरात शिवजयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे. राज्यातील विविध भागात विविधांगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार असल्याचीही माहिती यावेळी मंत्री खंवटे यांनी दिली.