अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांनी वाढवला

0
84

गोवा विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तारखांमध्ये होली वीकच्या पार्श्‍वभूमीवर थोडी दुरुस्ती करण्यात आली असून अधिवेशनाचा कालावधी आणखी दोन दिवसांनी वाढविण्यात आला आहे. गुरुवार १ एप्रिल २०२१ रोजी अधिवेशन घेतले जाणार नाही.

गोवा विधानसभेच्या अधिवेशनाच्या तारखांबाबत सुधारित सूचना जारी करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी होली वीकच्या पार्श्‍वभूमीवर होणार्‍या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाच्या दिवसांत दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. तसेच, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी होली वीकच्या सुट्टीच्या दिवशी अधिवेशनाचे कामकाज घेतले जाणार नाही, असे जाहीर केले होते. त्यामुळे १ एप्रिल २०२१ रोजी अधिवेशन घेतले जाणार नाही. तर, गुरुवार १५ एप्रिल आणि शुक्रवार १६ एप्रिल रोजी अधिवेशन घेतले जाणार आहे.