अतिरेकी समजून नागालँडमध्ये गोळीबार, १३ नागरिक ठार

0
75

नागालँडमधील मोन जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या गोळीबारात १३ नागरिकांचा मृत्यू झाला. अतिरेकी असल्याचे समजून सुरक्षा दलाच्या जवानांनी हा गोळीबार केला. त्यामुळे ही दुर्घटना घडली. ओटींग परिसरात घडलेल्या या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून संतप्त नागरिकांनी सुरक्षा दलांच्या गाड्या पेटवून दिल्या. दरम्यान, सुरक्षा दलांच्या गोळीबारत १३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराची ही घटना चुकून घडली का? याचा तपास केला जात आहे, अशी माहिती कोहिमा पोलिसांनी दिली.

गोळीबार ठार झालेले नागरिक हे कोळसा खाणी काम करणारे रोजंदारी मजूर होते, अशी माहिती स्थानिकांनी दिली. ठार झालेले पीडित मजूर होते आणि काम संपल्यानंतर पिकअपमधून त्यांच्या घरी जात होते. रात्री उशिरापर्यंत ते घरी न पोहोचल्याने गावकर्‍यांनी त्याचा शोध सुरू केला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती मिळाली.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागालँडचे मुख्यमंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला आहे. गोळीबारात नागरिकांचा झालेला मृत्यू ही घटना दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशीसाठी उच्चस्तरीय एसआयटी नेमली आहे. या चौकशीतून पीडित कुटुंबांना न्याय मिळेल आणि दोषींवर कारवाई केली जाईल, असे अमित शहा यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, या घटनेप्रकरणी भारतीय लष्कराने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच भारतीय लष्कराकडून घटनेबद्दल खेद व्यक्त करण्यात आला आहे.
या घटनेबाबत प्रशासनाकडून रात्री उशिरापर्यंत कोणताही दुजोरा देण्यात आलेला नव्हता.

सुरक्षा दलांना अतिरेकी असल्याची माहिती मिळाली होती. त्या ठिकाणी अतिरेकी संघटना एनएससीएनचे बंडखोर असतील. तसेच अतिरेकी हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे ऑपरेशनचे नियोजन करण्यात आले होते. सुरक्षा दलांना माहिती मिळाल्याने त्यांनी गाडी थांबण्याचे आवाहन केले. पण गाडी थांबवली नाही. यानंतर सुरक्षा दलांकडून गोळीबार केला गेला. पण नंतर ते नागरिक असल्याचे समोर आले. यामध्ये सुमारे १३ नागरिकांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, गावकरी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांकडून शस्त्रे हिसकावून घेतली. त्याची गाडी पेटवली. यामध्ये सुरक्षा दलाचा एक जवानही शहीद झाला.