अंदमान व निकोबार बेटांवर काल संध्याकाळी मध्यम तीव्रतेचा भूकंप झाल्याची नोंद आहे. मात्र या भूकंपामुळे कोणत्याही स्वरूपाची हानी झाल्याविषयी वृत्त नाही.
काल संध्याकाळी ७ वा. च्या सुमारास ५.५ रिश्टर क्षमतेच्या भूकंपाची नोंद भारतीय वेधशाळेत झाली आहे.