अंतर्गत लोकशाही नाही आली तर कॉंग्रेस संपेल

0
105

माकन यांचा घरचा आहेर
पक्षातील हायकमांड संस्कृतीवर टीका करत राष्ट्रीय स्तरावरील पक्षांमध्ये लोकशाही असणे अत्यंत गरजेचे असल्याचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अजय माकन यांनी म्हटले आहे. माकन राहुल गांधी यांचे निकटवर्तीय समजले जात असून त्यांच्या या टीकेमुळे कॉंग्रेसला घरचा आहेर मिळाला आहे.कोलकाता येथील ‘कलकत्ता क्लब – द टेलिग्राङ्ग नॅशनल डिबेट’ कार्यक्रमात बोलताना माकन म्हणाले की, कॉंग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही रुजणे गरजेचे आहे. पक्षातील हायकमांड संस्कृती बदलली जाणे ही काळाची गरज आहे. नपेक्षा काही दिवसानंतर कॉंग्रेसचे नामोनिशाणही शिल्लक राहणार नाही, असा इशारा माकन यांनी यावेळी दिला.
यावेळी माकन यांनी सगळ्या पक्षांची नावे घेतली. मात्र, त्यांचा रोख कॉंग्रेसवर होता. या चर्चासत्रात जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो, बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी, कॉंग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम, भाजपचे पश्‍चिम बंगाल प्रभारी सिद्धार्थनाथ सिंह सहभागी झाले होते.