सध्याच्या जागतिक आर्थिक वातावरणात १२व्या पंचवार्षिक योजनेला ९ टक्के विकासदर शक्य होणार नसल्याचे नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मोंटेक सिंग अहलुवालिया यांनी काल सांगितले. आता ८ टक्के विकासदराचे लक्ष्य ठेऊन त्यासाठीही बरेच कष्ट करावे लागणार असल्याचे अहलुवालिया म्हणाले. २०१२ ते २०१७पयर्र्ंत नवीन पंचवार्षिक योजना राबविण्यात येणार आहे.
अहलुवालिया म्हणाले की, जागतिक आर्थिक परिस्थिती वर्षभरापासून खुपच नाजूक बनत चालली आहे. त्यामुळे पंचवार्षिक योजनेच्या पहिल्या २०१२-१३ वर्षाचा विकासदर ६.५ ते ७ टक्के इतकाच राहण्याची शक्यता आहे.
दरम्यान, नव्या पंचवार्षिक योजनेचे काम प्रगतीपथावर असून आराखडा येत्या महिन्यात होणार्या राष्ट्रीय विकास मंडळाच्या बैठकीत सादर होईल. ही बैठक पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली होणार असून त्यात राज्यांचे मुख्यमंत्री भाग घेतील.